
Monday, 29 December 2008
Sunday, 28 December 2008
बापटांनी मराठ्यांवर अन्याय केला- मेटे

मराठा समाजावर बापट आयोगाने अन्याय केला असून या अहवालाचा निषेध तसेच होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने हा अहवाल त्वरित सराफ आयोगाकडे पाठवावा आणि आगामी निवडणुकांपूर्वी मराठा आरक्षणासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, असे ठराव मराठा समन्वय समितीच्या मंजूर करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.
डॉ. नितू मांडके हाऊस येथे रविवारी समितीच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची मेटे यांनी माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी चार जानेवारीला रायगडापासून आरक्षण जागृती यात्रा काढण्यात येणार असून त्याचा समारोप एक फेबुवारीला शिवाजी पार्क येथे होणार असल्याचे मेटे यांनी सांगितले. बैठकीत समितीची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.
Monday, 15 December 2008
Karkare wept over Malegaon charges

Minutes before he fell to the terrorists' bullets on November 26, Maharashtra ATS chief Hemant Karkare had wept before the then Deputy Chief Minister R R Patil, narrating the agony of being targeted over handling of the Malegaon blast probe. This was revealed by Patil, who was also in-charge of the police department, to newspersons gathered in Nagpur for the winter session of Maharashtra legislature on Monday.
"On November 26, Karkare came with the entire ATS team to meet me at around 2030 hrs. He was with me till 2130 hrs. With tears rolling down his eyes, Karkare told me about the allegations being levelled against him (in Malegaon blasts case)," Patil said. "Soon after Karkare left, came the news of his being killed. Maybe that was destiny," Patil said. Among prominent critics of Karkare were the Shiv Sena which riled the senior police official through its mouthpiece Saamana, alleging that ATS was working under political pressure while probing the blast in which some radical Hindu outfits had come under scanner.
Tuesday, 25 November 2008
संभाजी ब्रिगेडचे नांदेडला पाचवे राष्ट्रीय अधिवेशन - वैभव तळेकर
लातूर, ता. २५ - संभाजी ब्रिगेडचे पाचवे राष्ट्रीय महाअधिवेशन ३०नोव्हेंबरला नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव तळेकर यांनी दिली. या अधिवेशनाचे उद्घाटन कोल्हापूर संस्थानचे छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनंत चौंदे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष नांदेडचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे हे आहेत. या अधिवेशनाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात संघटनचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांचे "संभाजी ब्रिगेड ः मराठा अस्मितेचा लोकलढा' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थानी मनोज आखरे हे असून प्रमुख पाहुणे म्हणून बाबाराव शृंगारे, गुणवंत आठरे, हेमंत गौरकर उपस्थित राहणार आहेत.
इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचे "सामाजिक, सांस्कृतिक दहशतवाद आणि आजचा युवक' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रवीण गायकवाड राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष गाजरे, सोमनाथ नवले, मनोज वाघ, विकास पासलकर उपस्थित राहणार आहेत. शिवराज महाराज पंढरपूरकर यांचे ""तुकोबांचे "वार'करी ः संभाजी ब्रिगेड' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रदीप साळुंके राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. बालाजी वाघमारे, रणजित कारेगावकर, राजेंद्र आढाव, माधव पावडे उपस्थित राहणार आहेत.
या निमित्ताने नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे व सुरेश हावरे यांचा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. चौंदे राहणार आहेत. तरी या अधिवेशनाला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. तळेकर, कार्याध्यक्ष गोविंद सिरसाठ, ऍड. धनंजय भिसे, आकाश भोसले, महेश अलगुडे, शाहूराज पाटील, किरण बिडवे, बाळासाहेब जाधव , गोविंद पाटील यांनी केले आहे.
Thursday, 20 November 2008
ए. टी. एस. ने लावला मोका
मुंबई, ता. २० - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या दहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली (मोका) कारवाई करण्यात आल्याची माहिती या पथकाचे सह पोलिस आयुक्त हेमंत करकरे यांनी दिली. अतिशय संवेदनशील असलेल्या या प्रकरणाचा तपास करताना एटीएसवर कसल्याही प्रकारचा राजकीय दबाव नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. मालेगाव येथे २९ सप्टेंबरला मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचे बळी गेले, तर ८० जण जखमी झाले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, दयानंद पांडे ऊर्फ स्वामी अमृतानंद देव, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, श्यामलाल साहू, शिवनारायण कालसांगरा, अजय राहिरकर, राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे या दहा जणांना अटक केली. "अभिनव भारत' आणि "जय वंदेमातरम्' संघटनांशी संबंधित असलेल्या या आरोपींवर सुरुवातीला भारतीय दंड विधान कलमाखालील कायद्यांखाली कारवाई करण्यात आली होती. अटक आरोपींतील काहींचा यापूर्वीच्या गुन्ह्यांत सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर आज महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्या (मोका) खाली कारवाई करण्यात आली. मोका कायद्यातील कलम-३ च्या उपकलम सी-१,२ व ४ प्रमाणे ही कारवाई करण्यात आली. सध्या या प्रकरणाची सुनावणी नाशिक न्यायालयात सुरू आहे. मोका कारवाईनंतर ही सुनावणी मुंबईतील "मोका' न्यायालयात होणार आहे. माटुंगा पोलिसांनी अटक केलेल्या सुधाकर चतुर्वेदी या आरोपीची एटीएसने आज सायंकाळी कस्टडी घेतली असून, याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या अकरा होणार असल्याचेही करकरे या वेळी म्हणाले. या प्रकरणातील आरोपींच्या कारवाया देशातील विविध राज्यांत सुरू होत्या. त्यांच्याशी संबंधित काही साक्षीदारांचे जबाबही एटीएसने लिहून घेतले आहेत. या आरोपींना होणाऱ्या अर्थपुरवठ्याचादेखील तपास सुरू आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव अथवा दडपण आपल्यावर नाही. संपूर्ण तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. तपासावर आक्षेप घेत कोणी जनहित याचिका दाखल केल्या असतील, तर आपल्याला त्याची माहिती नाही. याप्रकरणी आपण न्यायालयाला उत्तरदायित्व असल्याचेही करकरे यांनी या वेळी सांगितले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एका आरोपीच्या चौकशीत "समझोता एक्स्प्रेस'मधील बॉम्बस्फोटाचा उल्लेख झाला होता. मात्र या प्रकरणाची खातरजमा सुरू असल्याचे सरकारी वकिलांनी यापूर्वीच सांगितले आहे. एटीएसने सध्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासावर लक्ष्य केंद्रित केले असून, अन्य स्फोटांबाबतची माहिती आवश्यकतेनुसार तपासयंत्रणांना दिली जाईल, असेही ते म्हणाले. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला कोठडीत होत असलेल्या मारहाणीचा आरोप खोटा आहे. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित व अन्य आरोपींच्या झालेल्या नार्को चाचणीचा अहवाल अद्याप पोलिसांकडे आला नसल्याचेही करकरे या वेळी म्हणाले. स्फोटाच्या तपासासंबंधी प्रसिद्धिमाध्यमांत येणाऱ्या बातम्या अनेकदा अटकळींवर आधारित असतात. या प्रकरणातील विविध पैलू तपास पूर्ण होण्याआधी प्रसिद्धीमाध्यमांसमोर उघडकीस आणल्यास ते तपासाला घातक ठरण्याची शक्यताही करकरे यांनी या वेळी वर्तविली.
-----------------------------------------------------
लेफ्टनंट पुरोहितच "अभिनव भारत'चा संस्थापक मालेगाव बॉम्बस्फोटांप्रकरणी एटीएसने अटक केलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यानेच फेब्रुवारी २००६ मध्ये "अभिनव भारत' संघटनेची स्थापना केल्याची माहिती एटीएसचे सह आयुक्त करकरे यांनी या वेळी दिली. मालेगाव बॉम्बस्फोटांतील आरोपींना पुरोहित याने मिथून चक्रवर्ती नावाने प्रशिक्षण दिल्याची बाब तपासाधिन असल्याचेही करकरे यांनी या वेळी सांगितले.
-----------------------------------------------------
राकेश धावडेवरील गुन्हे "मोक्का'साठी ठरले अनुकूल मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक केलेला आरोपी राकेश धावडे याचा परभणी व जालना येथील स्फोटात सहभाग सिद्ध झाला आहे. त्याच्याविरुद्ध परभणीच्या पूर्णा येथील मेहराजूल उलुम मदरशाजवळ बॉम्बस्फोट घडविल्याप्रकरणी ननलपेठ पोलिस ठाणे; तर जुना जालनाच्या मालीपुरा येथील जामा मशिदीजवळ स्फोट घडविल्याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मालेगाव स्फोटातील काही आरोपींवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असले, तरी राकेश धावडेवर दाखल असलेले गुन्हे मालेगाव स्फोटातील आरोपींना मोक्का लावण्याला महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जाते.
-------------------------------------------------------------
"रामजी'चा शोध सुरू मालेगाव बॉम्बस्फोटांप्रकरणी "रामजी' या आरोपीचा शोध सुरू आहे. तो या स्फोटातील महत्त्वपूर्ण आरोपी असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात "भगवान' नावाच्या आणखी एका व्यक्तीचे नाव पुढे येत असले, तरी या नावाचा व्यक्ती अस्तित्वात आहे अथवा नाही याचाही शोध सुरू असल्याचे हा अधिकारी म्हणाला. -------------------------------------------------------------
Wednesday, 19 November 2008
Subscribe to:
Posts (Atom)

