Sunday, 6 June 2010

तीर्थकुंडात लघुशंका करणाऱ्या बडव्याला शिक्षा

विठ्ठल मंदिरातील तीर्थकुंडात लघुशंका करणाऱ्या बडव्याला तीन महिने कैद

पंढरपूर, दि. ५ (प्रतिनिधी) - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील तीर्थकुंडात लघुशंका करणाऱ्या गोपाळ बडवे (वय ५५, रा. बडवे गल्ली, पंढरपूर) याला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.डी. सुभेदार यांनी तीन महिन्यांची साधी कैद, १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

राज्याची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरात १५ मे २००३ रोजी घडलेल्या या प्रकरणाने खळबळ उडाली होती. गोपाळ बडवे हा १५ मे २००३ रोजी मंदिरात झोपण्यासाठी आला होता. रात्री मंदिर बंद झाल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे काही कर्मचारी स्वच्छतेची कामे करीत होते. रात्री १.२० वा. गोपाळ बडवे हा मंदिरातील गोमुख या तीर्थकुंडाजवळ लघुशंका करीत होता. मंदिर समितीचे कर्मचारी माणिक यादव यांनी हा प्रकार पाहिला. यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलावून गोपाळ बडवेला ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली. वारकरी संप्रदायातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. विविध सामाजिक संघटनांनी निषेध करून गोपाळ बडवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली.


यानंतर मंदिर समितीचे कर्मचारी बाळासाहेब माळी यांनी याप्रकरणाबाबत तत्कालीन प्रांताधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीवरून रमेश चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गोपाळ बडवे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.


यानंतर पंढरपूर न्यायालयात खटला भरण्यात आला. न्यायालयात पाच जणांच्या साक्षी नोंदविल्या. तपासी अंमलदार आर.जे. कुलकर्णी यांच्या तपासातील बाबीही तपासण्यात आल्या. बचावासाठी सुधीर बडवे याने साक्ष दिली. सरकार पक्षातर्फे अॅड. दत्तात्रय नलावडे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने गोपाळ बडवे याला तीन महिने कैद तर १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

3 comments:

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
Anonymous said...

comment by: Sarang Madgulkar


आम्ही बडवे !

कुंडामध्ये केली ! आम्ही लघुशंका !!
वाजविता डंका ! कशासाठी ? !!
विठू चे देऊळ ! धंद्याचे ठिकाण !!
मांडले दुकान ! आम्ही तेथे !!

आम्हा नाही लाज ! नच वाटे भीती !!
विठोबाची प्रिती ! आम्हावरी !!
देऊळ भ्रष्टवू ! वा भक्तांना गटवू !!
बाजार बसवू ! विठ्ठलाचा !!

आश्चर्याने बोटे ! घालता तोंडात ?!!
देऊ थोबाडीत ! विठूच्याही !!
वेदांनीच दिला ! आम्हा अधिकार !!
विठू तर पोर ! आमचेच !!

धरिले वेठीस ! साक्षात विठूला !!
तुम्ही बापूडयानों ! भक्ति करा !!
हागून-मुतून ! करू आम्ही घाण !!
भक्तांसाठी स्थान ! पवित्रचि !!

-- भरत यादव, सोलापूर

(सन्दर्भ: देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे by प्रबोधनकार ठाकरे )

अमित रसाळ said...

१ हजार रु दंड भरला कि तो पु्न्हा चुक करायला मोकळा झाला
पंढरपुरात पांडुरंग आहे तर त्या क्षणी त्याला अॅटॅक येने वा पॅरॅलेसिस होने गरजेचे होते तर आमचा पर देव या संकल्पना वर विश्वास बसला असता