Thursday 19 February 2009

शिवचरित्रातून काय शिकावे? -श्रीमंत कोकाटे

शिवचरित्र हा पदोपदी प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे. शिवचरित्रातून आज आपणाला अनेक जीवनमूल्ये शिकता येण्यासारखी आहेत. शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. शिवरायांवर अनेक संकटे चालून आली. अफजलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान, सिद्दी जोहर, औरंगजेब अशा असंख्य शत्रूंशी महाराजांनी मोठ्या धैर्याने मुकाबला केला. म्हणजे शिवाजीमहाराज संकटसमयी रडणारे नव्हते, तर लढणारे होते. आज तरुणांनी संकटसमयी हताश, निराश न होता मोठ्या आत्मविश्‍वासाने संकटांविरुद्ध लढण्याची प्रेरणा शिवचरित्रातून घ्यावी.
शिवाजीराजे प्रयत्नवादी होते; निराशावादी नव्हते. शिवचरित्रातून आज आपण प्रयत्नवाद शिकला पाहिजे. शिवाजीमहाराज निर्व्यसनी होते. त्यांचे सर्व मावळेही (सैनिक) निर्व्यसनी होते. त्यामुळेच शिवाजीराजे यशस्वी झाले. व्यसनाधीन लोक कधीच क्रांती करू शकत नाहीत. शिवरायांच्या जीवनचरित्रातून निर्व्यसनीपणा तरुणांनी शिकावा.
शिवाजीराजे चारित्र्यसंपन्न होते. "शत्रूंच्या स्त्रियांचादेखील त्यांनी आई-बहिणीप्रमाणे आदर केला. ""ज्याला यश पाहिजे त्याने स्त्रीअभिलाषा धरू नये. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे!'' असे उद्‌गार शिवरायांनी वेळोवेळी काढले. हिरकणीच्या निर्भीडपणाचा, साहसाचा आणि मातृप्रेमाचा सन्मान करताना शिवाजीमहाराज म्हणाले होते, ""ताई, सर्व संकटांवर मात करून बाळाच्या ओढीने घरी जाणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत स्वराज्यात आहे, तोपर्यंत ते कोणालाही जिंकता येणार नाही.'' आपली आई राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानला. आज आपण २१ व्या शतकाची भाषा बोलतो. खरेच, आज स्त्री स्वतंत्र आणि सुरक्षित आहे?
एत्तद्देशीयांचे, जनमानसाचे राज्य
शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी मारणारे असंख्य मावळे बहुजनसमाजातून पुढे आले, कारण शिवाजीमहाराज समतावादी होते. शिवरायांचे राज्य रयतेचे, गरिबांचे, एत्तद्देशीयांचे, जनमानसाचे राज्य होते. शिवरायांनी कधी भेदाभेद केला नाही. त्यामुळेच वीर बाजी पासलकर, कान्होजी जेधे, येसाजी कंक, कृष्णाजी बांदल, कावजी कोंढाळकर, जिवाजी महाले, शिवाजी काशीद, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, शेलारमामा, बहिर्जी नाईक, हिरोजी भोसले, मदारी मेहतर, सिद्दी इब्राहिम इत्यादी नरवीर शिवरायांसाठी पुढे आले. आज सर्वत्र अविश्‍वासाचे सावट आहे. एकमेकांबद्दल कमालीचे गैरसमज आहेत. अशा काळात शिवरायांची निष्ठावान फळी कशी असेल?
शिवरायांच्याकडे आप-पर भाव नव्हता. नागनाथ महाराला महाराजांनी पाटील केले. रामोशी समाजातील बहिर्जीला गुप्तहेर खात्याचे प्रमुख केले. हंबीरराव मोहिते यांना सरसेनापती केले. जिवाजी महाले या नाभिकाला अंगरक्षक केले. माळी, धनगर, मातंग, महार, कोळी, आग्री, शेणवी, मुसलमान या सर्वांना शिवरायांनी हक्क-अधिकार दिले. आज जातीचे, धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे राजकारण झाले आहे. अशा काळात शिवरायांच्या चरित्रातून "समता' शिकावी.
शिवाजी महाराज निःस्वार्थी होते. ""एखाद्या गावच्या पाणवठ्यावरचे पाणी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका, अन्यथा रयत म्हणेल, की मुघलच बरे. संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपा अन्यथा एखादा उंदीर पेटती वात तोंडात धरून धावत सुटेल आणि ती वात कडब्याच्या गंजीला लागून गंजी जळून खाक होईल, मग पावसाळ्यात जनावरांना चारा मिळणार नाही. तेलवातीचे दिवे विझवून झोपा,'' अशी शिवरायांनी प्रजेची काळजी घेतली.
शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालादेखील हात लावू नका, अशा सूचना शिवरायांनी दिल्या. आज मात्र शेतकऱ्यांच्या भाजीचे देठच काय "शेतकरीच' जिवंत ठेवायचा नाही, असे क्रूर राजकारण शिजत आहे. शिवरायांनी शेतकऱ्यांना बी-बियाण्यांचा पुरवठा केला. ओसाड जमिनी ओलिताखाली आणल्या. वतनदारी-मिरासदारी बंद केली. पाणवठे, धरणे, तलाव बांधले. दुष्काळग्रस्तांना मदत केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर शिवरायांचे हे कृषिधोरण अवलंबावे लागेल.
अफजलखान आल्यानंतर शिवाजीमहाराज काही अनुष्ठानाला बसले नाहीत किंवा वारीला, कुंभमेळ्याला किंवा नारायण नागबळी करायला गेले नाहीत, तर "यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजवावे लागते, चातुर्य पणाला लावावे लागते,' हे महाराजांनी ओळखले होते. शिवरायांकडून आज वैज्ञानिक दृष्टिकोन शिकावा. शिवाजीराजांची लढाई आदिलशहा, मुघल, सिद्दी, पोर्तुगीज यांच्याविरुद्ध होती; पण ती राजकीय लढाई होती. धार्मिक लढाई नव्हती. याउलट शिवरायांच्या सैन्यात ३५ टक्के सैन्य मुस्लिमांचे होते. त्यांच्या २७ अंगरक्षकांपैकी १० अंगरक्षक मुस्लिम होते. त्यांचे पहिले चित्र रेखाटणारा मीर महंमद हा मुस्लिमच होता. आरमारदलाचे प्रमुख दर्या सारंग व दौलतखान हे मुस्लिमच होते. असे असंख्य मुस्लिम शिवरायांकडे होते. म्हणजे शिवाजीमहाराज धर्मनिरपेक्ष म्हणजेच समता, मानवतावादी होते. शिवचरित्रातून मानवतावाद शिकता येतो.
शिवाजीराजांचे सहा भाषांवर प्रभुत्व होते. जगाच्या स्पर्धेत टिकावयाचे असेल तर बहुभाषक असावे, ही प्रेरणा शिवचरित्रातून मिळते. कोणतीही अनुकूलता नसताना शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण केले. शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी गाव सोडले. त्यामुळेच ते कोकण, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, जिंजी जिंकू शकले. रेल्वे, विमान, हेलिकॉप्टर, मोबाईल, इंटरनेट, फॅक्‍स, ध्वनिक्षेपक इत्यादी अत्याधुनिक साधने नसताना शिवरायांनी अशक्‍य कार्य शक्‍य केले.
शिवाजीराजांनी झाडांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. "झाडे सर्वथा न तोडावी. लाकूड-फाटा हवा असेल तर जीर्ण झाड तोडा; पण त्या ठिकाणी नवीन झाड लावा. विनामोबदला शेतकऱ्यांकडून काही घेऊ नका. सागाची, आंब्याची, फळांची झाडे न तोडावीत,' असे आवाहन शिवरायांनी केले होते. आज पर्यावरण धोक्‍यात आले आहे. जागतिक तापमानवाढ हा जगापुढचा गंभीर प्रश्‍न आहे. सजीवसृष्टीचे म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण करावयाचे असेल तर शिवरायांच्या पर्यावरणदृष्टीची अंमलबजावणी करावी लागेल.
शिवाजी महाराज आज येणार नाहीत. आज आले तरी आपल्या हाती ढाल-तलवार देणार नाहीत, कारण ढाल-तलवारीची लढाई कालबाह्य झाली आहे. इथून पुढचे युद्ध ज्ञानाचे, विचारांचे, संगणक, माहिती तंत्रज्ञानाचे आहे. शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन आपण गाव सोडून न्यायपालिकागड, प्रशासनगड, चित्रपटगड, साहित्यगड, सांस्कृतिकगड, दूरदर्शनगड, शिक्षणगड, धर्मगड, कलावाङ्‌मयगड जिंकले पाहिजेत.

ब्राह्मण समाजाचे उदो उदो करण्यासाठी 'राजा शिवछत्रपति' मालिकेची निर्मिती











Saturday 14 February 2009

हिंदू तालिबानीकरण


प्रेमदिनी 'संस्कृतिरक्षकां'चा यथेच्छ धुमाकूळ


तमाम प्रेमीजनांच्या 'व्हॅलंटाइन डे' सेलिब्रेशनमध्ये मिठाचा खडा पडू नये म्हणून विविध हिंदुत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अगोदरच ताब्यात घेतले असले तरी शनिवारी तथाकथित 'संस्कृतिरक्षकां'नी महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत यथेच्छ धुमाकूळ घातला. पोलिसांनी श्रीराम सेना, शिवसेना, बजरंग दल आदी संघटनांच्या अंदाजे ६०० कार्यर्कत्यांना ताब्यात घेतले होते. तरीही अनेक ठिकाणी प्रेमीयुगुलांना कार्यर्कत्यांची अरेरावी सहन करावी लागली.

पुण्यात मारहाण, जबरदस्तीची लग्ने


खुल्लमखुल्ला 'व्हॅलंटाईन डे' सेलिब्रेट करणाऱ्या प्रेमिकांना शिवसेनेने शनिवारी सकाळी खडकवासला, पेशवेपार्क, सिंहगड येथे सळो की पळो करून सोडले. 'प्रेमकूजन' करणाऱ्या जोडप्यांना 'संस्कृती' शिकवण्यासाठी शिवसैनिकांनी मारहाण केलीच, शिवाय फुलांच्या मुंडावळ्या बांधून, एकमेकांना हार घालायला लावून त्यांची प्रतिकात्मक लग्नेही लावून दिली. पेशवेपार्कमध्ये तर तरुण- तरुणींना शिवसैनिकांनी अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांच्या हातात बळजबरीने भगवे झेंडे देण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त सतीश खंडारे यांनी सांगितले.

मिरजेत तरुणाचे गाढविणीशी लग्न


सज्जड इशारा देऊनही व्हॅलंटाईन डे साजरा करणाऱ्या तरुणाला अद्दल घडवण्यासाठी शिवसैनिकांनी मिरजेत एका तरुणाचे लग्न चक्क गाढविणीशी लावून दिले. शिवसैनिकांनी सांगलीतही विलिंग्डन कॉलेजसमोर निषेधाच्या घोषणा दिल्या.

बहिण-भावालाही सोडले नाही


उज्जैनमधील विक्रम विद्यापीठात गेलेल्या बहिण-भावाला प्रेमीयुगुल समजून बजरंग दलाच्या कार्यर्कत्यांनी अडवले. भावाला मारले, त्याची बॅग फाडली, तर त्याच्या बहिणीला अपमानित करून तिच्याशी गैरवर्तन केले. एका खोलीत होते म्हणून केवळ एक कॉलेजकुमार आणि एका विद्याथीर्नीला अपमानित करणाऱ्या आणि त्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणणाऱ्या हरयाणातील सब-इन्स्पेक्टरला निलंबनाला सामोरे जावे लागले. त्याची विभागांतर्गत चौकशीही केली जाणार आहे.

Friday 13 February 2009

मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास लोकसभा निवडणुकीत पडसाद उमटतील : सौ. खराडे


आरक्षण न मिळाल्यास बुलेट नव्हे, बॅलेट वापरू -अनंत चोंदे

उस्मानाबाद - शिवजयंतीच्या आधी मराठा समाजाला आरक्षणाची मागणी मान्य केली नाही तर आगामी निवडणुकांत मराठा समाज सत्ता परिवर्तन करून दाखवील. आम्ही आरक्षणासाठी बुलेट नव्हे, तर बॅलेट वापरू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी दिला.
उस्मानाबाद जिल्हा मराठा आरक्षण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. 13) जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला होता. या वेळी श्री. चोंदे बोलत होते. बार्शी नाक्‍यापासून घोषणा देत निघालेल्या या मोर्चात तरुण कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेली जीप होती. डॉ. आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर प्रमुख नेत्यांची भाषणे झाली.श्री. चोंदे म्हणाले, ""मराठा समाज हा जगाचा पोशिंदा आहे; पण बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे आत्महत्या कराव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांत मराठाच अधिक आहेत. जगाचा पोशिंदा असलेला समाज सुरक्षित राहू शकत नसेल तर त्यांच्यासाठी आरक्षण असलेच पाहिजे. मराठा समाजाने गेल्या 60 वर्षांमध्ये जात म्हणून सरकारकडे काहीच मागितलेले नाही; परंतु आता आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. राजकारणामुळेच मराठा समाजाचे तुकडे झाले आहेत; पण यापुढे मराठा समाजातील पुढाऱ्यांनी झेंडा कोणाचाही हाती घेतला तरी सोबत तांडा मात्र मराठ्यांचा ठेवला पाहिजे. सध्या विधानसभेत 113 मराठा आमदार आहेत; पण ते पक्षांचे प्रतिनिधित्व करतात, जातीचे नव्हे. ही बाब लक्षात घेऊन मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी राज्य सरकारने 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीपूर्वी मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर केले नाही तर येत्या निवडणुकांत बुलेट नव्हे, तर बॅलेटचा वापर करून सत्ता बदल केला पाहिजे,'' असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, शिवसेनेचे आमदार प्रा. रवींद्र गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष सौ. सिंधूताई मोरे, लोकभारती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अर्जुन जाधव, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांची भाषणे झाली. त्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डी. आर. बनसोड यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.या मोर्चात मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंके, प्रा. चंद्रजित जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संपतराव डोके, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पडवळ, डी. आर. कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल खोचरे, माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, राजाभाऊ मुंडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाबा पाटील, सभापती अण्णासाहेब देशमुख, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन बागल, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे मुकुंद सस्ते आदींसह जिल्ह्यातून आलेले तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
आता लक्ष्य शरद पवारांचे घर
महाराष्ट्रातील आघाडी सरकारची काडीही केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सल्ल्याशिवाय हालत नाही, हे लक्षात घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा निर्णय लवकर व्हावा, या मागणीसाठी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या कधीही केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या घरात स्वतःला कोंडून घेतील, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष अनंत चोंदे यांनी या वेळी दिला.

Monday 2 February 2009

A running thread of deep saffron

The people behind the Malegaon terrorist attack fell into three categories — Sangh parivar cadres, army men and old Savarkarites. The first person to be arrested by the police, Pragya Singh, was a sadhvi and former ABVP leader. A second group of the accused comprised army men, retired or not, related to the Bhonsle Military School (BMS). Major Ramesh Upadhyay, a former defence services officer was arrested first, but the key figure was Lt Col Prasad Purohit, who had approached Upadhyay when he was posted at Nasik as liaison officer. Purohit and Upadhyay imparted military training to young activists — including bomb making — and were instrumental in getting arms and explosives.
Most of the training camps took place in the BMS, which had been directed by Rtd Major P.B. Kulkarni between 1973 and 1988, andwho had been associated with the RSS since 1935. In fact, the Bajrang Dal organised training camps in the BMS (Nagpur) as early as 2001. The five accused mentioned above were all members of Abhinav Bharat, a Pune-based movement initiated by Purohit in June 2006, whose working president was Ramesh Upadhyaya but whose president was none other than Himani Savarkar, V.D. Savarkar’s daughter in law, who also headed the Hindu Mahasabha.
he people, the places and the modus operandi are revealing of the continuity that underlines the Hindu tradition of terror, harking back to V.D. Savarkar. The young, revolutionary Savarkar had created the first Abhinav Bharat Society in 1905. The movement drew its name and its inspiration from Mazzini’s ‘Young Italy’, but was also influenced by Frost Thomas’s Secret Societies of the European Revolution, a book dealing mostly with the Russian nihilists. The movement was dissolved in 1952, but ten years back, just before finishing his term as Hindu Mahasabha president, Savarkar had created the Hindu Rashtra Dal, another militia whose mission was to impart military training to the Hindus in order to fight the Muslims, Gandhi’s followers and the Mahatma himself. This movement cashed in on the work of the same institution — the Bhonsle Military School, started in 1935 by B.S. Moonje, another Nagpur-based Savarkarite, after a European tour which had exposed him to Mussolini’s Balilla movement.
Like the Abhinav Bharat of today, the Hindu Rashtra Dal attracted Hindutva-minded Maharashtrian Brahmins — especially from Poona — who found the RSS insufficiently active. Some of them also had connections to the British Army.
Nathuram Godse and N.D. Apte, the two main architects of Gandhi’s assassination, are cases in point. Godse thought that RSS strategy contented itself with “organisation for the sake of organisation”. The Hindu Rashtra Dal, by contrast, organised training camps where volunteers learnt how to manufacture bombs and use guns from bicycles and cars. The key instructor was N.D. Apte who had served the army as Assistant Technical Recruiting Officer. In this capacity, he could use the War Service Exhibitions — which were intended to attract young Indians to the army — to initiate Hindu Rashtra Dal members into the art of modern arms.
he Hindu Rashtra Dal’s terrorist agenda culminated in the assassination of Gandhi, who had already been a Savarkarite target before — in 1934, they threw a bomb in Poona Municipal Town Hall where Gandhi was making a speech against untouchability.
While today’s Abhinav Bharat belongs to an old tradition harking back to Savarkar and even Tilak, the new element here lies in the implication of one serving officer of the Indian army. Certainly, any institution can have a black sheep. But was he that isolated? He has already named other officers who would have been his more or less passive accomplices and his colleague, Upadhyay, who once headed the Mumbai unit of the BJP’s ex-servicemen cell. The BJP, indeed, inducted ex-army men in large numbers since the 1990s. After the BJP came to power in 1998, two dozens ex-servicemen more joined the party. This inflow of ex-army men may reflect the increasingly communal atmosphere of the institution. In December 2003, a survey by the Centre for the Study of Developing Societies for Tehelka, one of the first among army men — and probably the most comprehensive — showed that 19 per cent of the soldiers interviewed felt that the army practised some religious discrimination — and 24 per cent of the Muslims among them shared this view.
Instead of distancing itself from the Hindu terrorists, as it had done in the 1940s, this time the Sangh Parivar has decided to support the Malegaon accused. Bajrang Dal chief Prakash Sharma declared that “policy makers should be worried if the Hindus were taking to arms because of the government’s skewed approach to war on terror” and admitted that the Bajrang Dal was running training camps too “to boost their morale [the Bajrang Dal’s members]. The country wouldn’t get its Abhinav Bindras if there were no armed training for the youth”.
In a way, the RSS, with the Bajrang Dal, has created a buffer organisation to handle the dirty work that the Sangh was earlier obliged to do itself — work similar to that of the Savarkarite organisations, whether they are called Hindu Rashtra Dal or Abhinav Bharat.