Thursday 30 October 2008

महायज्ञविरोधात रविवारी 'कोल्हापूर बंद'चे आवाहन-म. टा.

महायज्ञ केल्यामुळे विश्वशांती होते, हे निव्वळ थोतांड असून, सोमवारपासून सुरू होणारा 'माँ वरदायिनी यज्ञ समिती'चा महायज्ञ कोल्हापूरच्या शाहूप्रेमी जनतेने उधळून लावावा, असे आवाहन लोकआंदोलन समितीने केले आहे.
गांधी मैदानावर सोमवारपासून तब्बल दहा दिवस महायज्ञ सुरू राहणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना यज्ञाचा हा घाट हाणून पाडण्यासाठी दहा दिवस गांधी मैदानावर मोर्चा काढून निदर्शने करण्याचा कार्यक्रम लोकआंदोलन समितीने गुरुवारी बिंदू चौकात जाहीर केला. महायज्ञविरोधात २७ लहान मोठ्या संघटना सहभागी झाल्या आहेत. ' छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर जनतेने या महायज्ञाला विरोध करावा, असा आग्रह धरला. या महायज्ञाच्या विरोधात उभारलेल्या आंदोलनात युवराज संभाजी व मालोजी सक्रीय सहभागी होणार असल्याचे सभेचे अध्यक्ष अॅड. गोविंद पानसरे यांनी जाहीर केले. '
महायज्ञाच्या संयोजकांचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे आहेत. त्यांचा बंदोबस्त सरकारने केला पाहिजे, अशी मागणी करत खा. सदाशिवराव मंडलिक यांनी यज्ञात आहुती म्हणून टाकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचे वाटप भुकेल्यांना करण्याचे आवाहन केले. रविवारच्या 'कोल्हापूर बंद'ला दुकानदार व उद्योजकांनी आपले व्यवसाय बंद ठेऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन पानसरे यांनी यावेळी केले.
' भारताला असलेले धामिर्क स्वातंत्र्य धर्माचा बाजार मांडण्यासाठी नाही. महायज्ञासारख्या कर्मकांडाचा आधार घेऊन समाजात फूट पाडणाऱ्या भोंदूंचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सरकारची आहे. महायज्ञामुळे विश्वशांती होते, हे निव्वळ ढोंग असून, अशा अफवा पसरवण्यांवर फौजदारी कारवाई करा, अशी मागणी प्रा. एन. डी. पाटील यांनी केली. इतिहासाचे गाढे अभ्यासक जयसिंगराव पवार यांनी 'महाराष्ट्र इतिहास परिषदे'तफेर् महायज्ञाला विरोध केला. परभणीत काही वर्षांपूवीर् असाच महायज्ञ केला गेला. परंतु त्यातून विश्वशांती होऊ शकली नाही, ही आठवण त्यांनी करून दिली.

वामन प्रतिमेचे दहन, यज्ञ रोखण्यासाठी उठाव करा- दैनिक लोकमत




Wednesday 29 October 2008

भोसला मिलिटरी स्कूलमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ट्रेनिंग घेतल्याचं उघड

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंगला अटक करण्यात आल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांचा स्फोटांशी संबंध असल्याबाबत एटीएसनं तपास सुरू केला आहे. दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 2001 मध्ये नागपूरच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये ट्रेनिंग घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मिलिटरी स्कूलचे संचालक सतीश सालफेकर यांनी याबाबत माहिती दिली. दोन वर्षांपूर्वी एटीएसनं त्यांच्याकडे चौकशी करत बजरंग दलाच्या प्रशिक्षण शिबिरांची माहिती घेतली होती. मात्र त्यानंतर एटीएसनं आमच्याशी काहीही संपर्क साधला नाही, असं स्पष्टीकरणही साल्फेकर यांनी दिलं.
नागपूरची भोसला मिलिटरी स्कूल ही नाशिकच्याच भोसला मिलीटरीची शाखा आहे. नांदेडमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर एटीएसनं हिंदुत्ववादी संघटनांवर बारीक नजर ठेवणं सुरू केल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.

मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांसदर्भात हिंदुत्ववादी संघटनांना मदत करणार्‍या दोन निवृत्त लष्करी अधिकार्‍यांसह, एक मेजर आणि एका कॅप्टनला उद्या नाशिकच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. समीर कुळकर्णी आणि रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय अशी त्या अधिकार्‍यांची नावे आहेत. यासंदर्भात 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाईल, असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.

दरम्यान भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झालेल्या बजरंग दलाच्या बहुचर्चित शिबिरामध्ये प्रशिक्षक म्हणून कॅ. शरदकुमार भाटे उपस्थित होते. त्यांनीएटीएस ला दिलेल्या माहितीची प्रत आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी निरंजन टकले यांनी मिळवली. त्यात दिलेल्या माहितीनुसार हे 40 दिवसांचे शिबिर होते. या शिबिरासाठी आरएसएसनं दिल्ली, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि दिल्ली इथल्या 115 जणांना आमंत्रीत केलं होतं. या शिबिरासाठी दोन रिटायर्ड आर्मी ऑफिसर आणि एक इंटेलिजंट एजन्सीचा रिटायर्ड ऑफिसर उपस्थित होता. मात्र या शिबिरामध्ये मुलांना अयोग्य गोष्टींचं प्रशिक्षणदेण्यात येत असल्याचं लक्षात आल्यानं आपण हे शिबिर कालावधीआधीच सोडून आल्याचं कॅ. शरदकुमार भाटे यांनी स्पष्ट केलं.

Sunday 12 October 2008

दैनिक लोकमत, दि. १२/१०/२००८




दैनिक लोकमत, दि. १३/१०/२००८


दादोजी शिवरायांचे गुरू नव्हतेच!- मटा, दि. १३/१०/२००८

डॉ. जयसिंग पवार यांचा पुनरुच्चार
दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराजांच्या नात्याबाबत वितंडवाद सुरू असतानाच, दादोजी हे महाराजांचे गुरू, शिक्षक किंवा मार्गदर्शक यांपैकी काहीही नव्हते', असा दावा महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे सवेर्सर्वा डॉ. जयसिंगराव पवार यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात नियुक्त केलेल्या सत्यशोधन सिमितीचे पवार हे सदस्य होते. दादोजी महाराजांचे गुरू होते, असे म्हणणाऱ्यांवर त्यांनी यावेळी खरपूस टीका केली.
'रानडेंपासून शेजवळकरांपर्यंतच्या इतिहासात कोेंडदेव गुरू होते, असा उल्लेख कुठेही नाही.
जेम्स लेनच्या विकृत वक्तव्यातून हा वाद उद्भवला. त्यानिमित्तानेच वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचा आपला प्रयत्न आहे', असे ते म्हणाले. ' खऱ्या-खोट्याची शहानिशा करण्यासाठी गेले दोन महिने आपण ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यानंतर दादोजी शिवाजी राजांचे गुरू नव्हते, या निष्कर्षाप्रत आलो. दादोजी हे केवळ प्रशासक होते. त्यांच्यापासून महाराजांनी प्रेरणा घेतली, असे कुठेही नमूद केलेले नाही', असे त्यांनी स्पष्ट केले. 'इतिहास कायम नसतो, जसे संशोधन होते, पुरावे मिळतात, तसा तो बदलत जातो', असेही ते म्हणाले. इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. वसंत मोरे यांनीही त्यांचे समर्थन केले.

Saturday 11 October 2008

दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नव्हते - डॉ. जयसिंगराव पवार, दैनिक सकाळ

कोल्हापूर, ता. ११ - दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नव्हते, असा खुलासा महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे संचालक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक नव्हते, असे डॉ. वसंतराव मोरे यांनीही यावेळी स्पष्ट केले.
शिवरायांचे गुरू कोण, हा विषय काही दिवसांपासून गाजतो आहे. महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा क्रीडा पुरस्कार तहकूब केला आहे. शासनाने नियुक्त केलेल्या सत्यशोधन समितीच्या अहवालावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर खुलासा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ""कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे शिक्षक, गुरू किंवा पालक अशा प्रकारची प्रतिमा समाजात रूढ झाली आहे. महाराजांवर लिहिलेल्या बखरी आणि त्या आधारे लिहिलेले इतिहास ग्रंथ कारणीभूत आहेत. सभासद बखर सोडल्यास अन्य सर्व बखरी पेशवेकालीन आहेत. काही बखरी महाराजांच्या निधनानंतर शे-सव्वाशे, तर काही पावणेदोनशे वर्षांनी लिहिल्या आहेत. त्यांचे लिखाण ऐकीव कथांवर आधारित असते. शिवकालीन सभासद बखरीत दादोजी हे शिवरायांचे शिक्षक किंवा गुरू होते, असा निर्देश नाही. इतिहास संशोधनात समकालीन कागदपत्रांना खरे महत्त्व असते.
दादोजींचा शहाजीराजेंशी १६३३ पासून १६४७ या काळात संबंध आला. त्या काळातील उपलब्ध कागदपत्रे (आदिलशाही फर्मानात) दादोजींचा उल्लेख सुभेदार म्हणून, तसेच शहाजीराजांच्या जहागिरीचा मुतालिक (कारभारी) म्हणून आला आहे.'' ते म्हणाले, ""इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, निनाद बेडेकर व गजानन मेहेंदळे यांनी पुरावे असल्याचा दावा केला आहे; पण ते सादर केले नाहीत, कारण त्यांच्याकडे एकही समकालीन पुरावा नाही. समकालीन असलेल्या कवी परमानंदांचे शिवभारत, जेधे करिना, आदिलशाही फर्माने, महजरासारख्या कागदपत्रांत दादोजींचा उल्लेख शिवरायांचे गुरू म्हणून आलेला नाही.'' मेहेंदळे चिकित्सक अभ्यासक आहेत. त्यांच्या शिवचरित्रात दादोजींचा उल्लेख गुरू म्हणून कोठेही आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुरेश शिपूरकर, डॉ. विजयराव शिंदे, शामराव खाडे, सौ. वसुधा पवार, मंजुश्री पवार आदी उपस्थित होते.

धम्म बुद्धांचा आणि बाबांचा


Saturday 4 October 2008

मराठा समाजाला आरक्षण का हवे? -मटा दि. ०५/१०/२००८

- प्रवीण गायकवाड (कार्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेड)

भारतीयांवर मनुवादी विचाराने व मनुस्मृतीच्या कायद्याने मोठा अन्याय केले आहे. मनुस्मृतीमुळे देशातला बहुसंख्य असलेला बहुजन समाज हक्क अधिकारापासून वंचित राहिला. ब्राह्माण, क्षत्रिय, वैश्य व शूद असे चार वर्ण परंतु कलियुगामध्ये ब्राह्माण व शूद हे दोनच वर्ण, यातील ब्राह्माण संपूर्ण अधिकार संपन्न व शूद हे अधिकार वंचित शूदांना सप्तबंदी लागू होती. यातील शिक्षण, संपत्ती, शस्त्र, रोटी, बेटी, तट व समुद उल्लंघन या सात बंदी यामुळे शूदवर्णाचे लोक अशिक्षित व दरिदी जीवन जगत होते. धर्मशास्त्राप्रमाणे शूद वर्णाच्या व्यक्तीने शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे डोळे काढावे, त्याची जीभ छाटावी व त्याच्या कानात शिसे ओतावे असा धर्म कायदा होता. सप्त बंदी कायद्याचा आधार घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला. संत तुकाराम महाराजांची गाथा बुडविली. छत्रपती शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड यांचे वेदोक्त प्रकरण गाजले आहे.
मराठा समाज हा हक्क अधिकारापासून वंचित होता. म्हणजेच तो शूद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्याने ख-या अर्थाने नवीन युगाला सुरुवात झाली. त्याची प्रेरणा घेऊन ब्रिटीश राजवटीमध्ये महात्मा जोतिराव फुले यांनी शूद समाजाला प्रबोधित करून आपल्या हक्कासाठी लढण्यास उद्युक्त केले. महात्मा जोतिबा फुले यांनी ब्रिटिशांकडे शूदवर्णाच्या अशिक्षित गोरगरीब समाजाला शिक्षण व विशेष सवलती देण्याची प्रथम मागणी केली. 'गुलामगिरी' या आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी शूद व अतिशूद समाजाची म्हणजेच शेती व शेतीवर उपजीविका करणाऱ्या लोकांची व्यथा मांडली आहे. शूद वर्ण म्हणजेच मराठा व आजचा इतर मागासवर्ग. अतिशूद म्हणजे अस्पृश्य व आदिवासी समाज, ज्याला आज आपण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती म्हणतो. महात्मा फुले यांनी शूद अतिशूदांसाठी मोठा सामाजिक लढा उभा केला. हे कार्य पुढे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या करवीर संस्थानामध्ये चालू केले. त्यांनी मोफत शिक्षण, मुलांसाठी सर्व जातींचे वसतीगृह व बहुजन समाजाला शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या राज्यामध्ये ५० टक्के आरक्षणाची व्यवस्था केली. त्यांनी ब्राह्माण, शेणवी, कायस्थ, पारशी वगळता उर्वरित मराठा बहुजन समाज हा शूदवर्णाचा असून शेतीवर उपजीविका करणारा अडाणी वर्ग आहे म्हणून त्यांना आरक्षण घोषित केले.
छत्रपती शाहूमहाराजांच्या या कार्याचे प्रतिबिंब म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आरक्षणाची तरतूद केली. त्यांनी अतिशूद वर्णाच्या लोकांना आरक्षणाची व्यवस्था केली. १५ टक्के अनुसूचित जाती, साडेसात टक्के अनुसूचित जमातीसाठी ३४१ व ३४२ कलम टाकले व इतर मागासवगीर्यांसाठी ३४० कलमानुसार आयोग नेमण्याची व्यवस्था केली. ३४० व्या कलामानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या इतर मागासवगीर्यांच्या जाती निश्चित कराण्यास व आरक्षणाचा लाभ देण्यास भारत सरकारने चाल-ढकल केल्याने बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला व इतर मागासवगीर्यांच्या हक्क अधिकारासाठी लढा दिला. भारतातील पहिला इतर मागासवगीर्यांसाठीचा आयोग म्हणजे १९५३ चा खा. काका कालेलकर आयोग. या आयोगाचे काम इतर मागासवगीर्यांच्या जाती निश्चित करणे व त्यांच्या उन्नतीसाठी सूचना करणे हे होते. या आयोगापूवीर् ब्रिटीश राजवटीमध्ये आठ आयोग जाती निश्चिती करण्यासाठी झाले होते. त्यांनी काढलेले निष्कर्ष हा होता की १. शूद वर्णाचे लोक, २ ब्राम्हणेतर लोक. ३ शेती करणारे व शेतीवर उपजिविका करणारे म्हणजे इतर मागासवगीर्य लोक या आधारे व एकूण भारत देशाचा अभ्यास करून कालेलकरांनी २३९९ जाती निेश्चित केल्या. यामध्ये मराठा समाजाचा मराठा म्हणून समावेश केला आहे. परंतु हा अहवाल लागू करण्यात आला नाही. पुढे १९७७ मध्ये मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने ३७४३ जाती निेश्चत केल्या. १३४४ जाती वाढवल्या. पण शूदवर्णाच्या व शेतीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाला वगळले, याची त्यांनी कुठलीही कारणे दिली नाहीत. हा सरळ सरळ मराठा समाजावर अन्याय झाला आहे. मात्र देशभरामध्ये मराठा समाजासारखे जीवन जगणारे जाट, कुमीर्, अहिर, यादव, रेड्डी, गौडा, नायर व महंतो यांचा समावेश केला आहे.
महाराष्ट्रात माळी, धनगर, वंजारी, तेली हेही सामाविष्ट झाले आहेत. १९९० मध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची घोषणा झाली. त्याला सवोर्च्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यामुळे १९९५ पर्यंत मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली नाही. इंदिरा साहानी विरुद्ध भारत सरकार या याचिकेमध्ये मागणी केली नसताना सवोर्च्च न्यायालयाने एक अन्यायकारक निर्णय देऊन ५० टक्केची मर्यादा घातली. केंद सरकारने नेमलेल्या खासदार नचिपन कमिटीने मात्र ही मर्यादा घटनाबाह्य असून ती रद्द करावी अशी शिफारस केंद सरकारकडे केली आहे. केरळमध्ये ७२ टक्के, कर्नाटकमध्ये ६९ टक्के, आंध्रात ६५ टक्के, राजस्थानात ६५ टक्के, महाराष्ट्रानेसुद्धा ५२ टक्के मर्यादा ओलांडली आहे. आता ५२ टक्के ओ. बी. सीं. ना ५२ टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. जो महाराष्ट्रात फक्त १९ टक्के मिळत आहे. हा ओबीसींवर अन्याय आहे सध्या फक्त पहिल्या टप्प्यातील नोकरीचा लाभ मिळत आहे. पण पदोन्नती, शिक्षण व राजकारणातला लाभ मिळत नाही. यावर मराठा व इतर मागासवगीर्य समाजाने एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. मराठा समाज ही जात नसून हा एक समूह आहे. आजच्या मराठ्यांची जात ही कुणबी आहे, हे अनेक वेळा ऐतिहासिक पुराव्यावरून सिद्ध करता येते. देशाच्या राष्ट्रगीतात मराठा हा शब्द येतो. भारतीय सैन्यामध्ये मराठा बटालियन आहे. 'मराठा मेला तर राष्ट्रही मेले. 'मराठा विना राष्ट्र गाडा न चाले' असे म्हटले जाते. महाराष्ट्रात राहणारा तो मराठा. मराठी बोलणारा तो मराठा म्हटले जाते. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील बारा बलुतेदार मावळ्यांना मराठा संबोधले जात होते. यावरून स्पष्ट होते की मराठा ही जात नसून प्रदेशवाचक शब्द आहे. महात्मा फुले हे शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणजे कुणब्यांचा राजा असे म्हणतात. १८८१ च्या जनगणेमध्ये मराठा व कुणबी या भिन्न जाती नसून एकच आहे. नंतर बॉम्बे गॅझेटियरप्रमाणे मराठा व कुणब्यांमध्ये भेदाभेद नाही. मराठा कुणीबीचे विवाह न्यायालयाने वैध ठरवले. गॅझेटियर ऑफ इंडियानुसार मराठा-कुणबी यांच्यात फरक नाही. शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी. मराठा कुणबी समाजाचे लग्नविधी, कुलदैवत, परंपरा, सण, उत्सव एकच आहेत. १ जून २००४ रोजी महाराष्ट्र सरकारच्या त्नक्र ८३ व्या दुरुस्तीप्रमाणे मराठा कुणबी व कुणबी मराठा यांना आरक्षणाचा लाभ मिळावा असे म्हटले आहे. वरील निर्णयावरून महाराष्ट्र सरकारला मराठा कुणबी एकच असल्याचे मान्य होते. कुणबी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतो. मात्र शूद वर्णाच्या शेतीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाला मात्र मिळत नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या समाजातील मोठा घटक असणाऱ्या मराठा समाजावर हा अन्याय आहे. आज मराठा समाजातील ८० टक्के तरुण हे दहावीनंतर शिक्षण सोडून देतात. कारण त्यांची आथिर्क परिस्थिती नसते व ग्रामीण शाळेमध्ये शिकल्यामुळे भाषेचा प्रश्ान् उद्भवतो. हा एक न्यूनगंड आहे. एकूण मराठा समाजातील ८२ टक्के लोक शेतीवर उपजीविका करत असतात. मुख्यत: निसर्गावर अवलंबून आहे. यातील ७० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. जिराईत शेतीचे मालक आहेत. म्हणून दारिद्य रेषेखाली जीवन जगत असतात. आत्महत्या करणाऱ्या ३७०० पैकी ३२४६ हे मराठा कुणबी समाजातील आहेत. कर्जबाजारीपणाने व्यथित आहे. आथिर्क दुर्बलतेमुळे सामाजिक स्तरही खालावला आहे. मागासवगीर्यांची व्याख्या करताना ज्या समाजाचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक आथिर्क दुर्बल आहेत व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना मागासवगीर्य समजावेत. आज महाराष्ट्रात मराठा समाजातील ८० टक्के समाज अशिक्षित आहे व ७० टक्के दारिद्य रेषेखाली जीवन जगत आहे. म्हणून तो मागासवगीर्य आहे व आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र आहे. आज मराठा समाज रोजगार हमी योजना, माथाडी कामगार, हमाली करणे अशा निकृष्ट दर्जाचे काम करून उपजीविका करत आहे. समाजाची संख्या मोठी असल्याने समस्याही खूप मोठ्या आहेत. सहकार चळवळ हे महाराष्ट्राला मराठा समाजाचे योगदान आहे. परंतु सरकारी धोरणामुळे सहकार चळवळ मोडकळीस आली आहे. राज्यकतेर् मराठा असल्यामुळे आपण मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतल्यास आपण जातीवादी ठरू अशी भीती बाळगतात. आजपर्यंत मराठा समाजाने स्वत:साठी ही पहिलीच मागणी केली आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाल्याने गेली अनेक वषेर् धुमसत असलेला आरक्षण समर्थक व आरक्षण विरोधक हा वाद संपुष्टात येईल व सामाजिक ऐक्य घडेल. छत्रपती शाहू महाराजांनी संपूर्ण बहुजन समाजाला आरक्षणाचा लाभ दिला. आज शाहूंचा मराठा आरक्षणाची मागणी करतो तर त्याला आरक्षणाचे लाभधारक विरोध करतात. याचा खेद वाटतो. म्हणून धर्मवादी जातीव्यवस्था गाडण्यासाठी समता, बंधुता, न्याय प्रस्थापित करण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देऊन राज्यर्कत्यांनी मनुवादाकडून मानवतावादाचा प्रवास पूर्ण करावा.