Thursday 30 October 2008

महायज्ञविरोधात रविवारी 'कोल्हापूर बंद'चे आवाहन-म. टा.

महायज्ञ केल्यामुळे विश्वशांती होते, हे निव्वळ थोतांड असून, सोमवारपासून सुरू होणारा 'माँ वरदायिनी यज्ञ समिती'चा महायज्ञ कोल्हापूरच्या शाहूप्रेमी जनतेने उधळून लावावा, असे आवाहन लोकआंदोलन समितीने केले आहे.
गांधी मैदानावर सोमवारपासून तब्बल दहा दिवस महायज्ञ सुरू राहणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना यज्ञाचा हा घाट हाणून पाडण्यासाठी दहा दिवस गांधी मैदानावर मोर्चा काढून निदर्शने करण्याचा कार्यक्रम लोकआंदोलन समितीने गुरुवारी बिंदू चौकात जाहीर केला. महायज्ञविरोधात २७ लहान मोठ्या संघटना सहभागी झाल्या आहेत. ' छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर जनतेने या महायज्ञाला विरोध करावा, असा आग्रह धरला. या महायज्ञाच्या विरोधात उभारलेल्या आंदोलनात युवराज संभाजी व मालोजी सक्रीय सहभागी होणार असल्याचे सभेचे अध्यक्ष अॅड. गोविंद पानसरे यांनी जाहीर केले. '
महायज्ञाच्या संयोजकांचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे आहेत. त्यांचा बंदोबस्त सरकारने केला पाहिजे, अशी मागणी करत खा. सदाशिवराव मंडलिक यांनी यज्ञात आहुती म्हणून टाकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचे वाटप भुकेल्यांना करण्याचे आवाहन केले. रविवारच्या 'कोल्हापूर बंद'ला दुकानदार व उद्योजकांनी आपले व्यवसाय बंद ठेऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन पानसरे यांनी यावेळी केले.
' भारताला असलेले धामिर्क स्वातंत्र्य धर्माचा बाजार मांडण्यासाठी नाही. महायज्ञासारख्या कर्मकांडाचा आधार घेऊन समाजात फूट पाडणाऱ्या भोंदूंचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सरकारची आहे. महायज्ञामुळे विश्वशांती होते, हे निव्वळ ढोंग असून, अशा अफवा पसरवण्यांवर फौजदारी कारवाई करा, अशी मागणी प्रा. एन. डी. पाटील यांनी केली. इतिहासाचे गाढे अभ्यासक जयसिंगराव पवार यांनी 'महाराष्ट्र इतिहास परिषदे'तफेर् महायज्ञाला विरोध केला. परभणीत काही वर्षांपूवीर् असाच महायज्ञ केला गेला. परंतु त्यातून विश्वशांती होऊ शकली नाही, ही आठवण त्यांनी करून दिली.

No comments: