Tuesday 25 November 2008

संभाजी ब्रिगेडचे नांदेडला पाचवे राष्ट्रीय अधिवेशन - वैभव तळेकर

लातूर, ता. २५ - संभाजी ब्रिगेडचे पाचवे राष्ट्रीय महाअधिवेशन ३०नोव्हेंबरला नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव तळेकर यांनी दिली. या अधिवेशनाचे उद्‌घाटन कोल्हापूर संस्थानचे छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनंत चौंदे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष नांदेडचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे हे आहेत. या अधिवेशनाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात संघटनचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांचे "संभाजी ब्रिगेड ः मराठा अस्मितेचा लोकलढा' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थानी मनोज आखरे हे असून प्रमुख पाहुणे म्हणून बाबाराव शृंगारे, गुणवंत आठरे, हेमंत गौरकर उपस्थित राहणार आहेत.
इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचे "सामाजिक, सांस्कृतिक दहशतवाद आणि आजचा युवक' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रवीण गायकवाड राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष गाजरे, सोमनाथ नवले, मनोज वाघ, विकास पासलकर उपस्थित राहणार आहेत. शिवराज महाराज पंढरपूरकर यांचे ""तुकोबांचे "वार'करी ः संभाजी ब्रिगेड' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रदीप साळुंके राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. बालाजी वाघमारे, रणजित कारेगावकर, राजेंद्र आढाव, माधव पावडे उपस्थित राहणार आहेत.
या निमित्ताने नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे व सुरेश हावरे यांचा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. चौंदे राहणार आहेत. तरी या अधिवेशनाला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. तळेकर, कार्याध्यक्ष गोविंद सिरसाठ, ऍड. धनंजय भिसे, आकाश भोसले, महेश अलगुडे, शाहूराज पाटील, किरण बिडवे, बाळासाहेब जाधव , गोविंद पाटील यांनी केले आहे.

Thursday 20 November 2008

ए. टी. एस. ने लावला मोका

मुंबई, ता. २० - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या दहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली (मोका) कारवाई करण्यात आल्याची माहिती या पथकाचे सह पोलिस आयुक्त हेमंत करकरे यांनी दिली. अतिशय संवेदनशील असलेल्या या प्रकरणाचा तपास करताना एटीएसवर कसल्याही प्रकारचा राजकीय दबाव नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. मालेगाव येथे २९ सप्टेंबरला मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचे बळी गेले, तर ८० जण जखमी झाले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, दयानंद पांडे ऊर्फ स्वामी अमृतानंद देव, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, श्‍यामलाल साहू, शिवनारायण कालसांगरा, अजय राहिरकर, राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे या दहा जणांना अटक केली. "अभिनव भारत' आणि "जय वंदेमातरम्‌' संघटनांशी संबंधित असलेल्या या आरोपींवर सुरुवातीला भारतीय दंड विधान कलमाखालील कायद्यांखाली कारवाई करण्यात आली होती. अटक आरोपींतील काहींचा यापूर्वीच्या गुन्ह्यांत सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर आज महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्या (मोका) खाली कारवाई करण्यात आली. मोका कायद्यातील कलम-३ च्या उपकलम सी-१,२ व ४ प्रमाणे ही कारवाई करण्यात आली. सध्या या प्रकरणाची सुनावणी नाशिक न्यायालयात सुरू आहे. मोका कारवाईनंतर ही सुनावणी मुंबईतील "मोका' न्यायालयात होणार आहे. माटुंगा पोलिसांनी अटक केलेल्या सुधाकर चतुर्वेदी या आरोपीची एटीएसने आज सायंकाळी कस्टडी घेतली असून, याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या अकरा होणार असल्याचेही करकरे या वेळी म्हणाले. या प्रकरणातील आरोपींच्या कारवाया देशातील विविध राज्यांत सुरू होत्या. त्यांच्याशी संबंधित काही साक्षीदारांचे जबाबही एटीएसने लिहून घेतले आहेत. या आरोपींना होणाऱ्या अर्थपुरवठ्याचादेखील तपास सुरू आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव अथवा दडपण आपल्यावर नाही. संपूर्ण तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. तपासावर आक्षेप घेत कोणी जनहित याचिका दाखल केल्या असतील, तर आपल्याला त्याची माहिती नाही. याप्रकरणी आपण न्यायालयाला उत्तरदायित्व असल्याचेही करकरे यांनी या वेळी सांगितले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एका आरोपीच्या चौकशीत "समझोता एक्‍स्प्रेस'मधील बॉम्बस्फोटाचा उल्लेख झाला होता. मात्र या प्रकरणाची खातरजमा सुरू असल्याचे सरकारी वकिलांनी यापूर्वीच सांगितले आहे. एटीएसने सध्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासावर लक्ष्य केंद्रित केले असून, अन्य स्फोटांबाबतची माहिती आवश्‍यकतेनुसार तपासयंत्रणांना दिली जाईल, असेही ते म्हणाले. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला कोठडीत होत असलेल्या मारहाणीचा आरोप खोटा आहे. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित व अन्य आरोपींच्या झालेल्या नार्को चाचणीचा अहवाल अद्याप पोलिसांकडे आला नसल्याचेही करकरे या वेळी म्हणाले. स्फोटाच्या तपासासंबंधी प्रसिद्धिमाध्यमांत येणाऱ्या बातम्या अनेकदा अटकळींवर आधारित असतात. या प्रकरणातील विविध पैलू तपास पूर्ण होण्याआधी प्रसिद्धीमाध्यमांसमोर उघडकीस आणल्यास ते तपासाला घातक ठरण्याची शक्‍यताही करकरे यांनी या वेळी वर्तविली.
-----------------------------------------------------
लेफ्टनंट पुरोहितच "अभिनव भारत'चा संस्थापक मालेगाव बॉम्बस्फोटांप्रकरणी एटीएसने अटक केलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यानेच फेब्रुवारी २००६ मध्ये "अभिनव भारत' संघटनेची स्थापना केल्याची माहिती एटीएसचे सह आयुक्त करकरे यांनी या वेळी दिली. मालेगाव बॉम्बस्फोटांतील आरोपींना पुरोहित याने मिथून चक्रवर्ती नावाने प्रशिक्षण दिल्याची बाब तपासाधिन असल्याचेही करकरे यांनी या वेळी सांगितले.
-----------------------------------------------------
राकेश धावडेवरील गुन्हे "मोक्का'साठी ठरले अनुकूल मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक केलेला आरोपी राकेश धावडे याचा परभणी व जालना येथील स्फोटात सहभाग सिद्ध झाला आहे. त्याच्याविरुद्ध परभणीच्या पूर्णा येथील मेहराजूल उलुम मदरशाजवळ बॉम्बस्फोट घडविल्याप्रकरणी ननलपेठ पोलिस ठाणे; तर जुना जालनाच्या मालीपुरा येथील जामा मशिदीजवळ स्फोट घडविल्याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मालेगाव स्फोटातील काही आरोपींवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असले, तरी राकेश धावडेवर दाखल असलेले गुन्हे मालेगाव स्फोटातील आरोपींना मोक्का लावण्याला महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जाते.
-------------------------------------------------------------
"रामजी'चा शोध सुरू मालेगाव बॉम्बस्फोटांप्रकरणी "रामजी' या आरोपीचा शोध सुरू आहे. तो या स्फोटातील महत्त्वपूर्ण आरोपी असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात "भगवान' नावाच्या आणखी एका व्यक्तीचे नाव पुढे येत असले, तरी या नावाचा व्यक्ती अस्तित्वात आहे अथवा नाही याचाही शोध सुरू असल्याचे हा अधिकारी म्हणाला. -------------------------------------------------------------

Sunday 2 November 2008

विश्वशांती किती खरी किती खोटी?

कोल्हापूर शहराचे नाव आठवतच राजश्री शाहू महाराजांची आठवण होते. ह्याच कोल्हापूर शहरात विश्वशांती यज्ञ आयोजित केला आहे. यज्ञ समितीच्या मते या यज्ञमुळे समाजात शांतता प्रस्थापित होईल, पुर्वी पासून यज्ञ होत आले आहेत आणि कोल्हापुरातच तीनशे वर्षा पुर्वी चाण्डी महायज्ञ झाल्याचा दाखलही यज्ञ समितीचे प्रमुख राम कुंडलाजी महाराज यांनी दिला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की या महायज्ञतून अंध श्रद्धा पसरवण्याचे काम होत आहे हे सिद्ध करावे मग मी सण्यासी व्रतचा त्याग करेन. जर ह्या यज्ञ तून खरोखरीच विश्वशांती प्रस्थापित होणार आसेल तर जे ह्या यज्ञला विरोध करतात त्या संघटनाना विश्व शांती नको आहे. यज्ञ समितीच्या मते यज्ञमुळे कोल्हापुरला तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळणार आहे. कोल्हापुरला राजश्री शाहू महाराजांमुळे प्रेरणा क्षेत्राचा दर्जा हा मिळाला आहे आणि तोच प्रेरणा क्षेत्राचा दर्जा राहू द्यावा. कोल्हापुरात पर्यटक गेल्यास अगोदर तो राजश्री शाहू महाराजांच्या राजवाड्यात गेल्या शिवाय राहत नाही. शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचीच प्रेरणा घेण्याची खरी गरज आहे.
आता ज्या साठी यज्ञ समितीने विश्वशांती यज्ञ आयोजित केला आहे त्याचे कारण विश्व शांती प्रस्थापित करणे हे दिले आहे. आज भारतिया समोर दहशत वाद, शेतकर्यांची आत्म् हत्या, बेरोजगारी, अन्न- धण्या चा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, बहुजन समाजाला शिक्षणाचा प्रश्न , असे बरेच प्रश्न त्यांच्या समोर आहेत. जर ह्यातील एक जरी प्रश्न महा यज्ञ ळे सुटणार आसेल तर तर जरूर हा यज्ञ हो द्यावा आणि ज्या संघटना विरोध करत आहेत त्यांनी पण यज्ञ व्यवस्थित होण्या साठी मदत करावी. कीबहुना ह्या साठी आर्थिक मदत पण करावी. आता महत्वाचे असे की ह्या यज्ञ मुळे खरच विश्वशांती प्रस्थापित होणार आहे का? आजचे युग हे विज्ञानचे युग आहे. मग हा यज्ञ विज्ञानाला आनुसरून आहे का? आणि विज्ञानाच्या कुठल्या थेरि मध्ये मोडत आहे? तर ह्याला एकाच उत्तर की हा यज्ञ आयोजित केलाआहे तो विज्ञानाच्या कुठल्याही चौकटीत बसत नाही. म्हणजे हा यज्ञ फ़क्त सामन्या जनतेची, त्या मध्ये बहुजन समाजाची दिशाभूल करण्या साठी आयोजित केला आहे हा निष्कर्ष निघतो. ह्या यज्ञ मध्ये लाखो रुपयाचे तूप आणि ईतर साहित्य भस्मसात होणार आहे. आजची वाढती महागायि आणि त्यात असा यज्ञ आयोजित करणे म्हणजे जे भुकेलेले, ज्यांना दोन वेळचे अन्न मिळत नाही त्या लोकांची टिंगल करण्या सारखे होय. आज जनतेला अशा यज्ञ ची गरज नसून आज पर्यंत जे जे थोर नेते हो उंन गेले त्या सर्व महा मानवाच्या प्रेरणाची गरज आहे. शाहू - फुले - आंबेडकर यांनी कधी अश्या यज्ञ ची मदत घेतलेली आठवते का? उलट शिवाजी महाराजा विरुद्ध मुघल सरदार जिंकवा म्हणून पुण्यातील काही ब्राह्मणानि कोटी चाण्डी यज्ञ आयोजित केला होता तरीही शिवाजी महाराजांना अपयश आले का? मुळीच नाही . शिवाजी महाराजा सारखा राजा आपल्या मातीत होउन गेला या सारखे दुसरे भाग्य तरी आहे का? त्यांच्या प्रत्येक कार्यात जी प्रेरणाची उर्जा आहे त्याची खरी गरज आहे.
कधी महाराज लढाई सोडून कर्म कांड करीत होते का? त्यांची श्राध्ा जरूर होती पण ती अशी अंध श्रद्धा कधीच नव्हती. आणि आज यज्ञ आयोजित करून ह्याच अंध श्रद्धेला खात पाणी घातले जात आहे हे निदर्शन होते. यज्ञ समितीचे प्रमुख राम कुंडलाजी महाराज यांनी यज्ञ ला विरोध करणार्‍यांशी चर्चा करण्याची तयारी दाखविली आहे. तर चर्चा जरूर होयला पाहिजे. कारण कुठलाही राडा न होता चर्चेने प्रश्न सोडवणे आणि सार्वजनिक माल मत्तेचे नुकसान ना होऊ देणे हेच सामन्या माणसाला जे यज्ञला विरोध करतात आणि जे यज्ञला पाठिंबा देतात त्याच्या कडून आपेक्षित आहे.

शिवश्री उस्मानाबाद