Sunday 12 October 2008

दादोजी शिवरायांचे गुरू नव्हतेच!- मटा, दि. १३/१०/२००८

डॉ. जयसिंग पवार यांचा पुनरुच्चार
दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराजांच्या नात्याबाबत वितंडवाद सुरू असतानाच, दादोजी हे महाराजांचे गुरू, शिक्षक किंवा मार्गदर्शक यांपैकी काहीही नव्हते', असा दावा महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे सवेर्सर्वा डॉ. जयसिंगराव पवार यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात नियुक्त केलेल्या सत्यशोधन सिमितीचे पवार हे सदस्य होते. दादोजी महाराजांचे गुरू होते, असे म्हणणाऱ्यांवर त्यांनी यावेळी खरपूस टीका केली.
'रानडेंपासून शेजवळकरांपर्यंतच्या इतिहासात कोेंडदेव गुरू होते, असा उल्लेख कुठेही नाही.
जेम्स लेनच्या विकृत वक्तव्यातून हा वाद उद्भवला. त्यानिमित्तानेच वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचा आपला प्रयत्न आहे', असे ते म्हणाले. ' खऱ्या-खोट्याची शहानिशा करण्यासाठी गेले दोन महिने आपण ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यानंतर दादोजी शिवाजी राजांचे गुरू नव्हते, या निष्कर्षाप्रत आलो. दादोजी हे केवळ प्रशासक होते. त्यांच्यापासून महाराजांनी प्रेरणा घेतली, असे कुठेही नमूद केलेले नाही', असे त्यांनी स्पष्ट केले. 'इतिहास कायम नसतो, जसे संशोधन होते, पुरावे मिळतात, तसा तो बदलत जातो', असेही ते म्हणाले. इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. वसंत मोरे यांनीही त्यांचे समर्थन केले.

No comments: