Saturday, 14 February 2009

हिंदू तालिबानीकरण


प्रेमदिनी 'संस्कृतिरक्षकां'चा यथेच्छ धुमाकूळ


तमाम प्रेमीजनांच्या 'व्हॅलंटाइन डे' सेलिब्रेशनमध्ये मिठाचा खडा पडू नये म्हणून विविध हिंदुत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अगोदरच ताब्यात घेतले असले तरी शनिवारी तथाकथित 'संस्कृतिरक्षकां'नी महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत यथेच्छ धुमाकूळ घातला. पोलिसांनी श्रीराम सेना, शिवसेना, बजरंग दल आदी संघटनांच्या अंदाजे ६०० कार्यर्कत्यांना ताब्यात घेतले होते. तरीही अनेक ठिकाणी प्रेमीयुगुलांना कार्यर्कत्यांची अरेरावी सहन करावी लागली.

पुण्यात मारहाण, जबरदस्तीची लग्ने


खुल्लमखुल्ला 'व्हॅलंटाईन डे' सेलिब्रेट करणाऱ्या प्रेमिकांना शिवसेनेने शनिवारी सकाळी खडकवासला, पेशवेपार्क, सिंहगड येथे सळो की पळो करून सोडले. 'प्रेमकूजन' करणाऱ्या जोडप्यांना 'संस्कृती' शिकवण्यासाठी शिवसैनिकांनी मारहाण केलीच, शिवाय फुलांच्या मुंडावळ्या बांधून, एकमेकांना हार घालायला लावून त्यांची प्रतिकात्मक लग्नेही लावून दिली. पेशवेपार्कमध्ये तर तरुण- तरुणींना शिवसैनिकांनी अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांच्या हातात बळजबरीने भगवे झेंडे देण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त सतीश खंडारे यांनी सांगितले.

मिरजेत तरुणाचे गाढविणीशी लग्न


सज्जड इशारा देऊनही व्हॅलंटाईन डे साजरा करणाऱ्या तरुणाला अद्दल घडवण्यासाठी शिवसैनिकांनी मिरजेत एका तरुणाचे लग्न चक्क गाढविणीशी लावून दिले. शिवसैनिकांनी सांगलीतही विलिंग्डन कॉलेजसमोर निषेधाच्या घोषणा दिल्या.

बहिण-भावालाही सोडले नाही


उज्जैनमधील विक्रम विद्यापीठात गेलेल्या बहिण-भावाला प्रेमीयुगुल समजून बजरंग दलाच्या कार्यर्कत्यांनी अडवले. भावाला मारले, त्याची बॅग फाडली, तर त्याच्या बहिणीला अपमानित करून तिच्याशी गैरवर्तन केले. एका खोलीत होते म्हणून केवळ एक कॉलेजकुमार आणि एका विद्याथीर्नीला अपमानित करणाऱ्या आणि त्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणणाऱ्या हरयाणातील सब-इन्स्पेक्टरला निलंबनाला सामोरे जावे लागले. त्याची विभागांतर्गत चौकशीही केली जाणार आहे.

1 comment:

AVINASH said...

what is about BHANDARKAR CENTRE attack? Is not it a MARATHA TALIBANI?