Wednesday 21 January 2009

जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचं आंदोलन


जिजाऊ ब्रिगेडच्या 23 महिलांनी सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मुंबईतल्या घरात कोंडून घेतलंय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी हे आंदोलन केलं आहे. याबाबत जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री शेळके सांगतात, 19 तारखेपासून जिजाऊ ब्रिगेडचं आंदोलन मुंबईतल्या आझाद मैदानात चालू आहे. महाराष्ट्रातील हजारो महिला या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. तरी अजूनही या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या काय आहेत हे विचारायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वा एकही मंत्री आला नाही. आपलं घरदार सोडून संपूर्ण महाराष्ट्रातून या महिला आलेल्या आहेत. कुणीच आपली दखल घेत नाही म्हणून या महिलांच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि म्हणूनच त्यांनी मंत्र्याच्या घरात कोंडून घेतलं. आता जो पर्यंत मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत निर्णय जाहीर करत नाही तो पर्यंत आम्ही घरातून बाहेर येणार नाही असं त्यांनी सांगितलं. घरातील कोणत्याही वस्तूंची नासधूस करण्याचा आमचा उद्देश नाही असं त्या म्हणाल्या. ज्या 23 महिलांनी हर्षवर्धन पाटलांच्या घरात कोंडून घेतलं आहे त्या जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्रातील महिला पदाधिकारी आहेत.

No comments: