Thursday 11 September 2008

शेतकरी मागतो आहे साथ, देईल का कोणी त्याला मदतीचा हात


एखादा समाज जर आरक्षण मागत आसेल तर त्या समाजाची आजची परिस्थिती काय आहे हे समजावून घेतले पाहिजे.
तसेच त्या समाजातील किती टक्केवारी शिक्षीत आहे, किती जन शिक्षण घेऊ शकतात हेही पहिले पाहिजे आणि त्यांची मिलकत किती आहे ते तपासून त्यानंतरच त्या समाजाच्या आरक्षणाला विरोध किंवा पाठिंबा देण्यात यावा.एक तर वरील दिलेल्या मुद्यांची कोणी चाचपाणी करत नाही आणि आज जो थोड्या प्रमाणात मराठा समाज हा पुणे-मुंबई इथे स्थाइक झाला आहे आणि १-२ टक्के मराठा समाजातील राजकारणी आहेत त्यावरून मराठा समाज हा पुढारलेला समाज आहे असा गैर-समाज होतो.

मुळात बहुसंख्य मराठा समाज हा खेडो-पाडि स्थाइक आहे आणि आपण सर्वांना इतके तरी माहीत आसेल की खेड्या-पाड्याची आजची स्थिती आणि स्वातंत्र्य-पूर्व काळातील परिस्थिती यात कितीसा फरक झालेला आहे. जाणकारणी हेही तपासून पहावे की स्वातंत्र्य प्राप्तीचा शेतकर्यांना किती उपयोग झाला आहे. इतकेच की एक लुटारे गेले आणि दुसरे आले. आज भारतातील खेड्यामध्ये आहे का कमीत कमी अर्धा दिवस वीज, आहेत का पक्या सडका? पिण्याच्या पाण्याची सोय? आरोग्या सुविधा?शालेय शिक्षणाची सोय आणि तेही दर्जेदार, मग काय विकास साधला आज पर्यंत? का विनाकारण भारत हा महाशक्तिशाली होणार याची भाषणे ठोकायची?

आज भारतातील शेतकरी आणि विकसनशील अथवा विकसित देशातील शेतकरी उदा. जपान, चीन, इत्यादी यांची तुलना केली तर इतके लक्षात येईल की जपान, चीन येथील शेतकरी हा एक प्रतिष्ठेचे जीवन जगात आहे आणि भारतातील शेतकर्याला मात्र दोन वेळेस चे जेवण महाग आहे मग कुठले आले शिक्षण. शिक्षण नाही मग आधुनिक शेती करण्याचा प्रश्नच येत नाही आणि पारंपरिक शेती करून दोन वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. त्यातच पा उस, मिळणारी वीज याचा
लपंडाव, पोटापाण्यासाठी , मुलीच्या लग्नासाठी थोडीफार आसलेली जमीन, घर विकून हवालदिल होऊन बसतो शेतकरी. शेवटी आत्महत्या हाच
पर्याय उरतो शेतकार्यपुडे. असेच हाल राहीले शेतकर्याचे तर एकदिवस शेतकरी नवालसुद्धा उरणार नाही. आज जसे डायानासोर या प्राण्याला फक्त नावाने ओळखले जाते तसाच काळ शेतकर्यासाठी येउ नये म्हणजे झाले.

शेतकरी हा भारताच्या पाठी चा काणा म्हणून ओळखला जातो पण तोच कणा मात्र आज खिळखिळा झालेला आहे आणि काही प्रमाणात गाळुन सुद्धा पडत आहे. जर पूर्णपणे गाळुन पडला तर एक दिवस शेतीवरील ताबा हा काही मूटभर लोकांच्या हाती जाइल, बाकीचे आपण समजण्यास समर्थ आहात. जाता जाता इतके सांगतो की शेतकरी मागतो आहे साथ, देईल का कोणी त्याला मदतीचा हात.

जय जिजाउ जय शिवराय जय भीम

-शिवश्री

No comments: