Sunday 14 September 2008

सेज़ नको किसान सेज़ हवे- डॉ. कलाम


"कुठलीही सुपीक जमीन सेज़ प्रकल्पा साठी विकू नका" हा महत्वच सल्ला शेतकर्यांना दिला आहे भारतरत्न डॉ. कलाम यांनी." मला कुठलाही शेतकरी शेतिविना पाहायाच नाही. मला माहीत आहे शेतकर्यासाठी आणि त्याच्या कुटुंबा साठी शेतीचे काय महत्व आहे. हे उदगार डॉ. कलाम यांनी " वर्ल्ड फाउंडेशन ओन् रेवरेन्स फॉर ओल लाइफ" या पुणे येथील कान्फरेन्स मध्ये काढले. सेज़चे महत्व पटवून देताना कलाम यांनी सांगितले की कुठलीही जमीन सेज़साठी उपयोगात आणणार आसाल तर त्या शेत जमिनीच्या मालकाला आजच्या बाजार

किमती नुसार त्याचा हिस्सा ( शेर) दिला पाहिजे जेणे करून तो आणि त्याचे कुटुंब रस्त्यावर येणार नाही. आणि त्या शेतकर्याला एकदाच शेत जमिनीची पूर्ण रक्कम न देता ठराविक काळानुसार आर्थिक मदत मिळायला हवी. डॉ. कलाम यांनी यासाठी पुणे येथील मगर पट्टा ह्या प्रकल्पाचे उदाहरण दिले ज्यात १२० शेतकरी सभासद आहेत.
त्याच बरोबर डॉ. कलाम यांनी शेतकर्यांना कापसाचे उत्पादन घ्यायचे आसेल तर भटिंडा ( राज्य: पंजाब) येथील शेतकर्यांचे अनुकरण करायलासुचविले. भटिंडा येथील शेतकरी योग्य प्रतिचे बियाणे, योग्य खत आणि आवश्यक कीटक नाशके वापरुन भरघोस उत्पादन काढीत आहे, ह्याचेच आनुकरण केल्यास शेतकर्यांच्या आत्महत्याचे प्रमाण सुद्धा कमी होऊ शकते, ह्या गंभीर प्रश्ना ला डॉ. कलाम यांनी हात घातला.


जय जिजाउ जय शिवराय जय भीम


-शिवश्री

No comments: