Wednesday 24 September 2008

दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नव्हते!-मटा दि. २५/०९/२००८

दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असा 'ऐतिहासिक' निष्कर्ष क्रीडामंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काढला आहे. त्यामुळे दादोजींच्या नावे क्रीडा प्रशिक्षकांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे नाव बदलण्यात येणार आहे. राज्य सरकारने नेमलेल्या समितीने एकमुखाने हा निष्कर्ष काढला असला तरी ख्यातनाम इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर आणि गजानन मेहेंदळे यांनी समितीच्या कामकाजातून अंग काढून घेतले, हे विशेष.
समितीच्या अहवालातील शिफारशी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना लवकरच सादर केल्या जातील. याबाबत पुढचा निर्णय मुख्यमंत्री घेतील,' असे क्रीडा व शालेय शिक्षणमंत्री वसंत पुरके 'मटा'शी बोलताना म्हणाले. शिफारशींचा तपशील देणे मात्र त्यांनी टाळले. दादोजी शिवरायांचे गुरू नसल्याने त्यांच्या नावे क्रीडा पुरस्कार दिल्यास कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी संभाजी ब्रिगेड, छावा या मराठा संघटनांनी दिली होती. त्यामुळे दादोजी शिवाजी महाराजांचे गुरू होते की नव्हते, याचा शोध घेण्यासाठी सरकारने पुरकेंच्या अध्यक्षतेखाली चौदा सदस्यीय समिती नेमली. बेडेकर व मेहेंदळे यांनी कामकाजात भाग घेतला नाही; तर डॉ. अ. रा. कुलकणीर् यांनी समितीला पत्र पाठवून 'दादोजी शिवरायांचे गुरू असल्याचा दाखला इतिहासात सापडत नाही,' असे सांगितले. समितीने यासंदर्भात विविध संघटना व व्यक्तींकडून मते मागवली असता, अडीच हजारांहून अधिक पत्रे आली. शिवकालीन कागदपत्रांमध्ये कुठेही दादोजींनी शिवाजी महाराजांना प्रशिक्षण दिल्याचा उल्लेख आढळत नाही. कोंढाणा किल्ल्याचे किल्लेदार असलेले दादोजी आदिलशाहचे सेवक होते, असा अभिप्राय सर्वच पत्रांमध्ये व्यक्त करण्यात आला.
तेव्हा जनमताचा हा कौल समितीने स्वीकारावा, अशी भूमिका डॉ. आ. ह. साळुंखे यांनी मांडली. अखेर दादोजी शिवरायांचे गुरू नव्हते, असा निष्कर्ष समितीने मंजूर केल्याची माहिती समिती सदस्य व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी 'मटा'शी बोलताना दिली.
क्रीडा प्रशिक्षक पुरस्काराला शहाजीराजांचे नाव? दादोजी कोंडदेव यांच्याऐवजी क्रीडा प्रशिक्षक पुरस्काराला शहाजीराजांचे नाव द्यावे, असा आग्रह अनेक समिती सदस्यांनी धरला आहे. त्याशिवाय लहुजी वस्ताद साळवे आणि शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार देण्याची सूचनाही काहींनी केली आहे.

3 comments:

प्रकाश पोळ said...

दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नव्हते tyamule ya puraskarache naav badalanech changale.
Baki Blog far chhan aahe.
Lage raho.
Also see www.prakashpol.blogspot.com

subhash said...

"दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नव्हते!"

visit-

www.dadojikonddev.blogspot.com

viju khedekar said...

we don't have any proof so what to do??????/ That's the problem.....
i don't think there is that much problem of award. it's just to motivate the players.......